किल्लेधारुर - वीज पडून शेतमजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार (दि.२९) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास धारुर तालुक्यातील धुनकवाड फाट्याजवळ सोनिमोहा शिवारात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दि.२९ शुक्रवार रोजी शेतात काम करित असतांना संगीता मच्छींद्र कराड (वय-४८) या महिलाच्या अंगावर वीज पडली. यात महिलेचा जागीच झाला. सदर महिला हि डुकडेगाव येथील मुळ रहिवासी असून सध्या सोनिमोहा येथे राहते. ही घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सोनिमोहा येथे धुनकवाड पाटी जवळ घडली. महिलेच्या मृत्यूची बातमी कळताच सोनिमोहा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .
बातमी शेअर करा