बीड - सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात असून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार,१८ सप्टेंबपर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
बातमी शेअर करा