गेवराई - सोलापूर धुळे महामार्गावर इन्होव्हा कार चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट पुलाच्या कठडड्याला धडकली. यामध्ये दोघे गंभीर जखमी असून गाडी पूर्णपणे डॅमेज झाल्याची घटना आज पहाटे शहागड पुलावर घडली आहे.
सोलापुर धुळे महामार्गावर (दि.९) रोजी पहाटे गोदावरी नदीवरील शहागड पुलावर भर वेगात येणार्या इनोव्हाकार चालकाने पुलावरील कठड्याला जोराची धडक दिली अपघातात कारमधील २ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे कारमधे एकुन ६ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती नागरीकांनी दिली आहे जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघातामध्ये कारचा समोरील भाग पुर्ण चमटला गेला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
बातमी शेअर करा