Advertisement

भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द होणार?

प्रजापत्र | Thursday, 07/09/2023
बातमी शेअर करा

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकात पुन्हा एकदा थरार रंगणार आहे. रविवारी 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. आता रविवारी होणाऱ्या सामन्यातही पावसाचे ढग ओढावले आहेत. Accuweather च्या वृत्तानुसार, रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. 

रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल... तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.

Advertisement

Advertisement