स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्मरर्स (केवळ माजी सैनिक/माजी CAPF/AR साठी राखीव) आणि लिपिक संवर्गातील( Clerical Cadre) कंट्रोल रूम ऑपरेटर (केवळ माजी सैनिक/राज्य अग्निशमन सेवा कर्मचारी/माजी CAPF/AR साठी राखीव) या पदांकरिता १०७ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्जाची प्रक्रिया ६ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० ऑक्टोबर आहे.
एसबीआय भरती २०२३ रिक्त जागा तपशील
ही भरती मोहीम १०७ रिक्त जागा भरण्यासाठी आयोजित केली जात आहे ज्यापैकी ८९ रिक्त पदे लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर पदासाठी आहेत आणि १८ रिक्त जागा आर्मरर्सच्या पदासाठी आहेत.
एसबीआय भरती २०२३ वयोमर्यादा
आर्मरर पदासाठी उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्षे असावे. कंट्रोल रूम ऑपरेटरच्या पदासाठी, उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि माजी सैनिक/ माजी CAPF/AR साठी कमाल वय ४८ वर्षे आणि राज्य अग्निशमन सेवा कर्मचार्यांसाठी ३५ वर्षे असावे.
अधिसुचना : https://sbi.co.in/documents/77530/36548767/050920231755-Detailed+AD+Fina...
एसबीआय भरती २०२३ अर्ज शुल्क
उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
एसबीआयच्या अधिकृत साईटला sbi.co.in वर भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, करिअर टॅबवर क्लिक करा
एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना भरतीसाठी लिंक दिसेल
लॉगिन तपशील किंवा नोंदणी तपशील टाका.
अर्ज भरा आणि कागदपत्रे जमा करा.
अर्ज सादर करा
पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.