Advertisement

सप्टेंबर महिन्यात कसा असणार पाऊस

प्रजापत्र | Thursday, 31/08/2023
बातमी शेअर करा

राज्यभर पावसाची स्थिती चिंताजनक बनली आहे. जून महिन्या सरासरीपेक्षा कमी पाऊस, त्यानंतर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जून महिन्याची पावसाची कमतरता भरुन निघाली. मात्र ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्याने राज्यावर दुष्काळाचं सावट आहे.

आता सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कसा असेल याकडे शेतकऱ्यांसह अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. पावसाअभावी उभी पिकं करपली तर येत्या काळात पाऊस पडला नाहीतर अनेक भागात पाणीटंचाईलाही सामोरं जावं लागू शकतं.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सप्‍टेंबरमध्‍ये येणार्‍या 4 आठवड्यांसाठी हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. 

सप्‍टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यामध्‍ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो,  असा अंदाज आहे. दक्षिण द्वीपकल्प, महाराष्‍ट्रात मराठवाडा, कोकण, गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्या चांगल्या पुनरागमनाची शक्‍यता आहे.

Advertisement

Advertisement