गेवराई- शहरातील रंगार चौक परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा आज (दि.२८) सकाळी मृतदेह आढळला आहे.पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तविली असून मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर खरे कारण समोर येणार आहे.
मनोहर विलास पुंड (वय-३६ रा. रंगार चौक,गेवराई) असे त्या तरुणाचे नाव आहे.गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय फराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहरचा मारहाणीत मृत्यु झाला आहे.सध्या गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु असून थोड्यावेळात खरे कारण समोर येणार असल्याचे श्री.फराटे म्हणाले.दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून गेवराई पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बातमी शेअर करा