गेवराई-धान्य घोटाळ्यात गेवराई नायब तहसीलदार एन.भंडारी आणि गेवराईचे गोदामपाल उमेश कुडदे यांची प्राथमिक चौकशी करूण त्यांना सोडण्यात आले आहे. मात्र तलवाडा,मादळमोहीचे गोदामपाल संजय राजपुत यांची सुटका झाली नसून त्याला न्यालयालाने एक दिवसांचीपोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी ही माहिती दिली.
काळ्या बाजाराचा व्यापार करणाऱ्या अरूण मस्के यावर धान्य प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा भावाला म्हणजे मोहन मस्केला पुरावा नष्ट केल्या प्रकरणी एसआटी पथकाने ताब्यात घेतले होते.त्यानंतर गेवराई पुरवठा विभागातील नायब तहसीलदार ए.एन.भंडारी व गोदामपाल उमेश कुडदे आणि गोदामपाल संजय रजपूत यांना एसआयटीने ताब्यात घेतले.उमेश कुडदे आणि नायब तहसीलदार यांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आले असून तलवाडा,मादळमोहीचे गोदामपाल संजय राजपुत याची सुटका झाली नाही. त्याला न्यायलयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment