Advertisement

लॉजवर चालत असलेल्या वेश्या व्यावसायावर पोलिसांचा छापा

प्रजापत्र | Friday, 25/08/2023
बातमी शेअर करा

आष्टी - शहरातील राधिका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला असून यावेळी २ पिडीतांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी लॉज चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

नगर जामखेड महामार्गावरील आष्टी तहसिल कार्यालयासमोर असणाऱ्या राधिका लॉजिंगवर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून त्याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री करुन घेतली. त्यानंतर गुरुवार (दि.२४) रोजी रात्री पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी आपल्या पथकासह छापा मारला. यावेळी  सांगली, कर्नाटक, बँगलोर येथून मुली आणून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यासाय चालवताना असतांना आढळून आला. येथील दोन पिडीत महिलांची पोलिसांनी सुटका केली असून मालक लहु सानप कासेवाडी ता.आष्टी यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस हे करत आहेत.

 

सदरील कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस सपोनि विजय देशमुख, सपोनि विजय गोसावी, पो.कॉ सचिन पवळ, मपोशि एम एस शेख, चापोशि दादासाहेब भगत आदींनी केली.

Advertisement

Advertisement