Advertisement

आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा!

प्रजापत्र | Monday, 21/08/2023
बातमी शेअर करा

30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

 

बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली, ज्यामध्ये संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे.

 

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळाले आहे. दोन्ही खेळाडू अजूनही दुखापतीतून सावरत आहेत. तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

रोहित शर्माशिवाय शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान मिळाले आहे. इशान किशन आणि केएल राहुल यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान दिले आहे.

 

कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांची आशिया कपसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , टिळक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

Advertisement

Advertisement