Advertisement

आठ दिवसापासून आठ गावाची वीज झाली गुल,जनजीवन विस्कळीत

प्रजापत्र | Monday, 21/08/2023
बातमी शेअर करा

हुंकार बनसोडे

उस्मानाबाद - मागील सलग आठ दिवसापासून तूूळजापूर तालुक्यातील बारूळ, व्हनाळा या गावात लाईट नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिठाची गिरणी बंद असल्याने अडचणीत वाढ झाली आह. तर चारपाच किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. आधीच पाऊस नसल्याने अस्मानी संकटाशी सामना करणाऱ्या ग्रामस्थांना आता विजवीतरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सुलतानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

 

याबाबत वारंवार तक्रारही करून काही फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांनी आज सकाळी आठ वाजल्यापासून बारुळच्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन मध्ये ठिया आंदोलन सुरू केलं आहे. या बाबत कुठल्याच लोकप्रतिनिधीनी विचारणा केली नसल्याचं सांगत यात आता जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

लाईट सुरळीत मिळावी म्हणून बारूळच्या ग्रामस्थांनी गावातील जमीन देऊन सबस्टेशनला परवानगी दिली याचा फायदा बारुळसह व्हनाळा या गावासह इतर सहा गावांना होत होता. पण पूर्वी या फीडरवर नसलेल्या इतर गावांना या फिडरशी जोडल्यामुळे बारूळ आणि व्हनाळा या गावाला पुरेशी वीज मिळत नाही.ही अनधिकृत जोडणी असून यांच्यामुळे वारंवार तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून एखादा अपघात ही होऊ शकतो असे ग्रामस्थ सांगत आहेत.

 

याबाबत विजवीतरण कंपनीच्या प्रशासनास कळवून देखील दुर्लक्ष केलं जातं पावसाने हुलकावणी दिल्याने इंधन विहीर आणि विहिरीला पाणी असून देखील पीक करपून जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून शेतकरी ग्रामस्थ बारुळच्या सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन करत होते. तब्बल सहा तास ठिय्या देऊनही महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कसलीही दखल घेतली नाही. चार गावांची मर्यादा असताना आठ गाव जोडण्यात आली आहेत.त्यामुळे एकाही गावाला व्यस्थित लाईट मिळत नाही. त्यामुळे पाणी असून देखील पीक करपत आहेत.पिण्याचे पाणी सुद्धा चारपाच किलोमोटर चालत जाऊन आणावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Advertisement

Advertisement