Advertisement

धनंजय मुंडेंवर राष्ट्रवादीने दिली कोणती जबाबदारी?

प्रजापत्र | Friday, 18/08/2023
बातमी शेअर करा

 

बीड दि. १८ : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता राज्यात संघटना वाढीसाठी रणनीती आखली असून प्रत्येक मंत्र्यांना काही जिल्हयांची जबाबदारी दिली आहे. यात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीडसह चार जिल्हयांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संघटना वाढीसाठी मंत्र्यांना जिल्ह्यांचे वाटप केले आहे. सध्याच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे चार मंत्री आहेत. यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, परभणी, नांदेड, व जालना या जिल्हयांची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयाची जबाबदारी सांभाळणार आहेत तर छगन भुजबळ - नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर आणि संजय बनसोडे - हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement