Advertisement

भाजपाचा मनसेपुढे युतीचा प्रस्ताव

प्रजापत्र | Monday, 14/08/2023
बातमी शेअर करा

मुंबई - सत्ताधारी भाजपने मनसेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवल्याचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, भाजपने मनसेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला. पण राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे व अजित पवारांमुळे त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. विशेषतः राज यांनी भाजपचा हा प्रस्ताव अद्याप फेटाळला नसल्यामुळे ते यावर कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी वांद्रे येथील MIG क्लबमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी भाजपने ठेवलेल्या युतीच्या प्रस्तावावर भाष्य केल्याचा दावा एका मराठी वृत्तवाहिनीने केला आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, राज ठाकरे म्हणाले की, मला भाजपकडून युतीची ऑफर मिळाली आहे. पण मी त्यावर कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही. सद्यस्थितीत एकनाथ शिंदे व अजित पवार भाजपसोबत आहेत. ते अजित पवार यांचे काय करणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. युतीचे नेमके गणित काय असणार? यावरही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे मी तूर्त अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलो नाही.

Advertisement

Advertisement