Advertisement

'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

प्रजापत्र | Friday, 11/08/2023
बातमी शेअर करा

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे संजय सिंह यांचं निलंबन वाढवण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम ठेवलं जाईल असं राज्यसभेकडून सांगण्यात आलं आहे. 

 

राघव चढ्ढांचं निलंबन कशासाठी?

पाच खासदारांचा असा दावा आहे की, दिल्ली सेवा विधेयकाला त्यांच्या संमतीशिवाय निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सादर केला होता. विरोध करणाऱ्यांमध्ये तीन भाजपा खासदार, एक बीजेडीमधील आहे. याशिवाय अण्णाद्रुमूकच्याही खासदाराचा समावेश आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीची मागणी केली होती. 

Advertisement

Advertisement