Advertisement

सरकारने सुशिक्षित बेरोजगारांची लुट थांबवावी- प्रकाश आंबेडकर

प्रजापत्र | Thursday, 10/08/2023
बातमी शेअर करा

 

अकोला - सरळ सेवा भरती मार्फत सुशिक्षित बेरोजगारांकडुन अवाजवी शुल्क वसुली थांबवावी अन्यथा वंचित बहुजन युथ आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा देत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरीता निधी जमवण्यासाठी खासगी कंपन्याचा वापर सरकार करत आहे असा आराेपही आंबेडकर यांनी केला. 

 

अकाेलाे येथे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले जिल्हा परिषद सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून बेरोजगारांकडून‌ ९०० ते‌ हजार रुपये शुल्क वसूल केले जात आहेत. हे म्हणजे दिवसढवळ्या सुशिक्षित बेरोजगारांना लुटण्याचा प्रकार आहे असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.

 

युपीएससी आणि एमपीएससी याच्या सर्व परिक्षांसाठी नाममात्र शुल्क आतापर्यंत आकारले जात होते. त्याचप्रमाणे शुल्क वसुली करावी. अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल इशारा प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी सरकारला दिला. यावेळी वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Advertisement

Advertisement