बीड - ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वेळेवर काढण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज (दि.१०) रोजी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. यामध्ये अनेक ग्रामरोजगार सेवकांचा सहभाग आहे.
ग्रामरोजगार सेवकांच्या सहीशिवाय मस्टर काढण्यात येऊ नये, ग्रामपंचायतमध्ये कामाची संख्या ठरवून टार्गेट वाटप करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांचे वेळेवर मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज रोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. दरम्यान शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
बातमी शेअर करा