अविनाश इंगावले
गेवराई-शहरालगच्या पाढंरवाडी येथे खाजगी गोदामात छापा टाकल्या प्रकरणी भाजप कार्यकर्ता अरूण मस्के यांच्यावर गेवराई पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होतो.आरोपी अद्याप फरार आहे.याच प्रकरणी त्याचे भाऊ मोहन मस्के याला ताब्यात घेतल्यानंतर न्यायलयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.तर मंगळवारी पहाटे गोदामपाल संजय रजपूत,गोदामपाल उमेश कूडदे यांच्यासह नायब तहसीलदार ए.एन.भंडारी यांना ही ताब्यात घेतले आहे. उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी ही माहिती दिली.
गेवराई तालुक्यात सुरू असलेल्या राशन तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर अनेक मोठे अधिकारी यात सहभागी असल्याचे समजते.परंतू गोदामपाल संजय रजपूत यांना अटक झाल्याने या प्रकरणात गेवराईच्या पुरवठा विभागात संशयाचा धूर निघत आहे.राशन माफिया यांना अभय देणार्या दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे तहसिलदार गेवराई धोंडिबा गायकवाड यांनी सांगितले होते.दरम्यान मंगळवारी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून यात गोदामपाल संजय रजपूत,गोदामपाल उमेश कूडदे यांच्यासह नायब तहसीलदार ए.एन.भंडारी यांचासमावेश आहे .विशेष म्हणजे नायब तहसीलदार ए एन भंडारी हे या प्रकरणात फिर्यादी असून त्यांना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment