Advertisement

इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर

प्रजापत्र | Friday, 04/08/2023
बातमी शेअर करा

इंडिया आघाडी ची मुंबईतील बैठक लांबणीवर गेली आहे. आता इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक लांबणीवर पडली आहे. आधी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्टला ठरली होती, आता मात्र ही बैठक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणार आहे.

 

इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर
इंडिया आघाडीची मुंबईत होणारी बैठक काही दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. काही नेत्यांनी आपण ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. या नेत्यांमध्ये शरद पवारांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली होती. कारण 16 ऑगस्ट रोजी थोरले पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी आपण मुंबईत उपलब्ध असू शकणार नाही, असं पवारांनी कळवल्याची माहिती समोर आली आहे.

 

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक
26 पक्षांच्या विरोधी आघाडी असलेल्या 'इंडिया'ची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी सांगितले होते की, या बैठकीत ते आघाडीची समन्वय समिती, संयुक्त सचिवालय आणि इतर पॅनेलसाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement