Advertisement

जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु

प्रजापत्र | Friday, 28/07/2023
बातमी शेअर करा

नाशिक - नांदूरमधमेश्वर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने 7,924 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर पाणी दाखल होत असल्याने पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून  नांदूर मधमेश्वर धरणाच्या दोन वक्रार गेट द्वारे 7,924 क्यूसेक पाण्याचा विसर्ग मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीत सुरू करण्यात आला आहे दारणा, गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यास नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्गात वाढ करण्यात येईल  त्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांनी नदी काठी जाऊ नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. 

Advertisement

Advertisement