जळगाव - एका वस्तीगृहातील 5 अल्पवयीन मुलीवर वसतीगृहाच्या केअरटेकरने लैंगिक अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकारात संबंधित केअरटेकरला त्याच्या पत्नीची साथ असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.गणेश शिवाजी पंडित असे आरोपीचे नाव आहे. तो वसतीगृहाचा केअरटेकर म्हणून तो कार्यरत असून त्याने वस्तीगृहातील 5 अल्पवयीन मुलींचे शोषण केले. ऑगस्ट 2022 ते जून 2023 म्हणजे तब्बल दहा महिन्यांपर्यंत त्याने अनेकदा पीडित मुलींचे लौंगिक शोषण केले. अशी नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.
तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडकी गावातल्या वस्तीगृहातील पाच बालिकांवर अत्याचार प्रकरणी तिघांच्या विरोधात एरंडोल तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मुलींचे शासकीय वस्तीगृहातील घटना
एरंडोल तालुक्यातील खडकी या गावात मुलींचे शासकीय वसतीगृह असून येथे वास्तव्यास असणार्या पाच बालिकांवर अत्याचार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वस्तीगृहाचा केअरटेकर म्हणून काम करणार्या व्यक्तीनेच हे संतापजनक कृत्य केले असून त्याला हॉस्टेलची अधिक्षका आणि सचिवाने सहकार्य केल्याचे निष्पन्न झाले असून या तिघांच्या विरोधात एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर प्रकरणाला फुटली वाचा
गेल्या जून महिन्यात वस्तीगृह बंद पडल्यानंतर या वस्तीगृहात असलेल्या पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. या मुली तिथे गेल्यानंतर त्यांची सर्वांसोबत मैत्री झाली. त्यानंतर या मुलींनी वसतीगृहातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वस्तीगृहात असताना आपल्यासोबत तेथील केअर टेकरने केलेल्या लैंगिक अत्याचारविषयी माहिती दिली. तेव्हा हे सर्व प्रकरण समोर आले.