मुंबई - मागील अनेक दिवसांपासून ठाकरे गट आमदार अपात्रेच्या मुद्दावरून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेत नसल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितलं होतं. ही मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा तापणार हे निश्चित.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे विधानसभा अध्यक्षांकडून अवलोकन सुरू आहे. मागील दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. ही मुदत शुक्रवारी संपणार आहे. तसेच विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात अद्याप लेखी उत्तर देण्यात आलेले नाही.
बातमी शेअर करा