बीड दि.24 (प्रतिनिधी): शहरातील शिवाजीनगर पोलीसांनी दोन दिवसांपूर्वी एका गुटखा पुरवठादाराला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून मुळ गुटखामाफीया कोण आणि कोणाकडून माल येतो याची माहिती घेणे अपेक्षित असतांना शिवाजीनगर पोलीसांकडून त्या आरोपीने ज्या पानटपर्यांवर गुटखा विकला त्या टपरीवाल्यांना कार्यक्षेत्राबाहेर जावून टार्गेट केले जात आहे. त्याचवेळी मुळात गुटखा आला कोठून याचा शोध घेण्यात शिवाजीनगर पोलीसांना फारसे स्वारस्य नसल्याचे चित्र असल्याने शिवाजीनगर पोलीसांच्या या भुमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी दोन तीन दिवसांपूर्वी गुटखा प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली. सदर व्यक्ती बीड शहरात व परिसरात पानटपर्यांवर गुटख्याचा पुरवठा करतो, खरे तर त्या व्यक्तीकडे गुटखा आला कोठून याची माहिती घेतली जाणे आणि त्याची पाळे ‘मुळे’ शोधणे अपेक्षित असतांना शिवाजीनगर पोलीसांकडून मात्र त्यावर ‘चादर’ टाकण्याचा प्रयत्न होत आहे. सदर आरोपीकडून गुटख्याच्या धंद्यातले मुळ माफीया शोधणे अपेक्षित असतांना पोलीस मात्र त्याने कोणत्या पानटपरीवर गुटखा विकला ही माहिती घेण्यात मग्न आहेत. यासाठी कार्यक्षेत्राबाहेर जावून देखील काही टपरीवाल्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे मोठे मासे सोडून शिवाजीनगर पोलीस केवळ कारवाई दाखविण्यासाठी टपरीवाल्यांना टार्गेट करणार आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्रजापत्र | Tuesday, 25/07/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा