आशिया चषक 2023 च्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा होऊन महिनाभर झाला, पण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामुळे वेळापत्रकाला उशीर होत असल्याचे समोर आले आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या सहमतीने आशिया चषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी 14 जुलै रोजी आशिया चषकाचे वेळापत्रक जारी होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दंबुला अथवा कोलंबो या ठिकाणी होणार आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, त्यामुळेच आशिया चषकाच्या वेळापत्रकाला उशीर होत आहे. शुक्रवारी सविस्तर वेळापत्रक जाहीर होण्यास शक्यता आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जाका अशरफ डरबन यांच्यामध्ये नुकतीच भेट झाली. या भेटीमध्ये आशिया चषक आणि विश्वचषकासंदर्भात चर्चा झाल्याचे समजतेय. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल असणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. श्रीलंकामध्ये आशिया चषकाचे 9 सामने होणार आहे तर चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आशिय चषकाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. आशियन क्रिकेट काऊन्सिल शुक्रवारी आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करणार असल्याचे समोर आलेय. 31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.