Advertisement

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींची 2 वर्षांची शिक्षा कायम

प्रजापत्र | Friday, 07/07/2023
बातमी शेअर करा

 

अहमदाबाद - मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा कायम राहणार आहे. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.

 

23 मार्च 2023 रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या निकालानंतर 27 मिनिटांनी त्यांना जामीन मिळाला. दुसऱ्या दिवशी 24 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजता त्यांचे खासदारपद रद्द झाले. या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी राहुल यांनी सुरत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला. यानंतर राहुल गांधी यांनी 25 एप्रिल रोजी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानंतर 2 मे रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. याप्रकरणी आज गुजरात न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.

Advertisement

Advertisement