Advertisement

जयंत पाटलांना हटवलं तटकरेंना नेमलं!

प्रजापत्र | Monday, 03/07/2023
बातमी शेअर करा

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनिल तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्षाने मला अधिकृत रितीने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी सप्टेंबर २०२२ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो. जयंत पाटील यांची नियुक्ती आम्ही केली होती. संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती. तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. 

''आम्ही आता जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करत आहोत. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत'', अशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

 

 

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

संघटनामक दृष्टीने नियुक्त्या करण्यास आम्ही सुरुवात करत आहोत मला पक्षाने अधिकृत कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती

September 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन झाले, त्याआधी मी उपाध्यक्ष होतो संघटनात्मक नियुक्त्या मी जाहीर केल्या होत्या

जयंत पाटील यांची आम्ही नियुक्ती केली होती संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या तरी तात्काळ म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती

सुनील तटकरे यांनी आजच कामाला लागावे जयंत पाटील यांनी सगळा पदभार तटकरे यांच्याकडे सोपवावा, अशी सूचना केली आहे राज्यातील इतर बदल सुनिल तटकरे यांना करण्याचा अधिकार असेल

दरम्यान, अनिल पाटील हेच प्रतोद असलीत असं प्रफुल्ल पटेल म्हणालेले आहेत. आता पक्षाचे सर्व अधिकार हे जयंत पाटील यांच्याकडे असतील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकुच करतोय, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी पुन्हा सांगितलं.

 

 

काय म्हणाले अजित पवार?
सुनील तटकरे हे अध्यक्ष झाले आणि काही निर्णय घेतले 
विरोधी पक्ष नेता नेमण्याच काम विधानसभा अध्यक्ष यांचं काम असत जास्त सख्या असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता हे पद मिळत मात्र आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत महाराष्ट्राचा भल्यासाठी काम करत राहणार

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय त्यांच्या पाठीशी उभं राहून राज्याच्या हितासाठी काम करणार केंद्रात राज्यात वेगळी सरकारे असतील तर निधी कमी मिळतो आम्हीच राष्ट्रवादी पक्षाच्या हिताचे करतो आहोत त्यांना नोटीस काढण्याचा अधिकार नाही पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे आमच्या सोबतच्या आमदारांचे भवितव्य यांना घटना कायद्याची कोणतीही अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ

Advertisement

Advertisement