Advertisement

राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप

प्रजापत्र | Sunday, 02/07/2023
बातमी शेअर करा

 

बीड : शिंदे फडणवीस सरकारला दोन दिवसांपूर्वीच एक वर्ष झाले असतानाच राज्य आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर आले आहे. येत्या काही तासातच राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत असून आज रात्रीपर्यंत राज्याला मोठे राजकीय धक्के बसतील असे संकेत मिळत आहेत. अजित पवारांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली असुंन या बैठकीत काही तरी मोठे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला होता. त्यावर पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला न्हाई. यासाठी शरद पवारांनी ६ जुलै रोजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली असतानाच आजच विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी स्वतःच्या देवगिरी निवास्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली. सकाळपासून सदर बैठक सुरु असून या बैठकीला राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांसह सौमरे ३० आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. या बैठकीला खा. सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती असली तरी या बैठकीचा सूर मात्र काहीसा वेगळा असून यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल असे सांगितले जात आहे. या बैठकीला जयंत पाटील मात्र उपस्थित नाहीत.

 

दुसरीकडे  राजभवनात देखील वेगळ्याच हालचाली सुरु असून यामुळे देखील वेगळे संकेत मिळू लागले आहेत.
शरद पवार यांनी यासंदर्भात पत्रकारपरिषद घेऊन अजित पवार यांना विरोधीपक्ष नेता म्हणून आमदारांची बैठक घेण्याचा अधिकार आहे. पण पक्ष नेतृत्वाबाबत ६ जुलै रोजी बैठक ठेवली आहे. असे निर्णय मी एकटा घेत नाही असे सांगितले आहे. 

 

Advertisement

Advertisement