बीड-येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुंतागुंतीच्या आणि अवघड शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.गोरगरीब रुग्णावर जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात कधीच न झालेल्या शस्त्रक्रिया सुद्धा होऊ लागल्या आहेत.त्यामुळे गोरगरिबांना त्याचा मोठा फायदा होत आहे.मराठवाड्यातील शासकीय रुग्णालय असलेल्या बीडमध्ये पहिल्यांदाच टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली असून डॉक्टरांच्या या कामिगिरीबद्दल सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातील गौतम नरहरी वगरे रा घोंनशी (वय-३९) या रुग्णावर कृतीम सांधे रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया खाजगी हॉस्पिटलमध्ये केली असती तर चार लाख रुपये खर्च आला असता विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयाने दाखल झालेल्या रुग्णा च्या खुब्यावर होत असलेल्या टोटल हिप रिप्लेसमेंट , म्हणजे कृतीम सांधे रोपण शस्त्रक्रियेसाठी विशेष साहित्य खरेदी केले होते. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया विभागात हे मोठ ऑपरेशन झालं. असं मोठा ऑपरेशन पहिल्यांदाच मराठवाड्यात जिल्हा रुग्णालय च्या इतिहासात झाल्याचं सांगण्यात आलं.
जालना जिल्ह्यातील गौतम नरहरी वगरे हा रुग्ण गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या खुब्यावर सांधे रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेला खाजगी हॉस्पिटलमध्ये साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो. ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णाच्या इतिहासात प्रथमच अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विजय कट्टे, डॉक्टर सचिन देशमुख, डॉक्टर प्रवीण देशमुख, डॉक्टर कदम, भूलतज्ञ डॉक्टर शिंगणे, डॉक्टर शाफे, डॉक्टर वाघमारे, ओटी इन्चार्ज जी पी उबाळे सिस्टर,ब्रदर घुले, आरोग्य सेवक श्रीराम माने, यांनी ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. जिल्हा रुग्णालयात अतिशय गुंतागुंतीच्या आणि आर्थिक दृष्ट्या महागड्या असणाऱ्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात मोफत होत असल्याने गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर विश्वास ठेवत रुग्ण आडमिट होतात आणि अवघड शस्त्रक्रिया करून घेताना दिसून येत आहेत.