Advertisement

जुलै महिन्यात कसा असणार पाऊस

प्रजापत्र | Saturday, 01/07/2023
बातमी शेअर करा

 

पुणे - दरवर्षी जून महिन्यात दाखल होणार मान्सूनने यंदा वाट पाहण्यास लावली. बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनचे चित्र बदलले. कोकणात ११ जून रोजी आलेला मान्सून राज्यात २५ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस होत आहे. यंदा जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस असणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.मोहोपात्रा यांनी जुलै महिन्याचा पावसाच्या अंदाजासंदर्भात माहिती दिली.

 

काय म्हणाले मोहोपात्रा
जून महिन्यात सरासरीचा १० टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. परंतु जुलै महिन्यात देशात सर्वत्र दमदार पाऊस असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.मोहोपात्रा यांनी दिली. जुलै महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड या राज्यात चांगला पाऊस होणार आहे. यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस उशिराने दाखल झाला. २५ जून रोजी महाराष्ट्रात पाऊस आला. त्यानंतर जुलै महिन्यात तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश या भागात पाऊस झाला.

 

 

पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट
पुणे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांत यलो अन् ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ३ अन् ४ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत गेल्या आठवडाभर चांगला पाऊस झाला आहे.

2 जुलै आणि 3 जुलैनंतर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यासोबतच संपूर्ण देशात जुलै महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचं भाकित करण्यात आले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार असल्यामुळे शेतकरी समाधानी होणार आहे. तसेच या महिन्यात राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement