पंजाब: कृषी कायद्याविरोधात 18 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता पंजाब पोलिसही आले आहेत. DIG(जेल) लखमिंदर सिंह जाखड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ADGP (जेल) पीके सिन्हा यांनी राजीनाम्याची प्रत मिळाल्याची पुष्टी केली आहे.
लखमिंदर यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले की, राज्यातील शेतकरी संकटात आहेत. थंडीत आभाळाखाली रस्त्यावर आंदोलन करत आहेत. मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. यामुळे मला या आंदोलनाचा भाग व्हायचे आहे. त्यामुळे मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा, जेणेकरून दिल्लीत जाऊन आपल्या शेतकरी बांधवांसोबत आपल्या हक्कासाठी लढा देऊ शकेल.
बातमी शेअर करा