बीड - छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्त बीड शहरामध्ये भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (दि.२६) रोजी सकाळी ७.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून या भव्य अभिवादन रॅलीला सुरुवात करण्यात आली.
रॅली मध्ये शाहू महाराज यांच्या जय घोषाने बीड शहर दुमदुमले होते. सदरील रॅली माळीवेस चौक मार्गे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, सहा…सहाय्यक समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे, सीए. बी.बी.जाधव, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप उपरे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव उत्तम पवार, सुशिला मोराळे, प्रा.राम गायकवाड, प्राचार्य.डॉ.पांडुरंग सुतार,प्रा.अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे, निवृत्त सीईओ पी.व्ही बनसोडे, उघाडे, बळवंते,भास्कर सरपते, वानखेडे, गुलाब भोले, राजकुमार कदम, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, सतीश कापसे यांच्यासह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच बीड शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक योगदानाबद्दल तसेच त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सखोल विश्लेषण करत त्यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती सांगितली.