Advertisement

बीडमध्ये बालविवाह रोखला

प्रजापत्र | Wednesday, 21/06/2023
बातमी शेअर करा

बीड - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसांपुर्वीच साक्षाळपिंप्री येथील बालविवाह रोखल्यानंतर आज (दि.२१) रोजी दुपारच्या मुहूर्तावर बीडच्या खडकपुरा भागात होणारा बालविवाह प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रोखला.

शहरातील खडकपुरा भागात आज दुपारी १२.३० च्या सुमारास लग्न सोहळा आयोजीत करण्यात आला होता. मात्र हा बालविवाह असल्याची माहिती प्रशासन आणि सामाजिक कार्यकत्यांना मिळाली. तहसीलदार तथा आयएएस अधिकारी आदित्य जीवने, नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुधीर ढाकणे, पेठ बीड ठाण्याचे पोउपनि आर. एस. पवार, सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, सारिका यादव, स्वप्नील कोकाटे यांनी तात्काळ विवाहस्थळी धाव घेवून नियोजीत वेळेआधी बालविवाह रोखला.

Advertisement

Advertisement