बीड दि.17 ः आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन शनिवारी (दि.17) समाजिक कार्यकर्ते व देवस्थान जमीन प्रकरणातील तक्रारदार राम खाडे यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली आहे.
प्राजक्ता धस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रामदास सुर्यभान खाडे हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असून राजकिय द्वेषापोटी माझ्या व माझ्या पतीच्या विरुद्ध सातत्याने बदनामीकारक विधाने करुन ते वर्तमानपत्रात प्रसिद्धीस देत आहे. तसेच शुक्रवारी स्टेटस ठेवले होते. त्यात माझे पती त्यांना मारण्याचा कट रचत आहेत, आणि माझ्या विरुद्ध कितीही नीच वृत्तीचे कृत्य केले तरी देव त्यांना माफ करणार नाही, व त्यांना जेलमध्ये जावेच लागणार असल्याचा उल्लेख होता. अशा प्रकारे बदनामीकारक स्टेटस ठेवून जनसामान्यात प्रतीम मलीन करत आहे. याप्रकरणी आष्टी पोलीसात खाडे विरोधात कलम 500, 501 नुसार एनसी दाखल करण्यात आली आहे.
आरोपी फिर्यादीच्या विरोधात तक्रार द्यायला जातात हे अश्चर्य-राम खाडे
देवस्थान जमीन हडपल्याप्रकरणी माझ्या फिर्यादीवरुन सुरेश धस, प्राजक्ता धस आदींवर गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल असतानाही आष्टी पोलीसात जावून माझ्याविरोधात तक्रार दिली हे अश्चर्य म्हणावे लागेल. हिंदू देवस्थानच्या जमीनी लाटणार्यांनी बदनामी झाल्याच्या गोष्टी करु नयेत, या प्रकणाचा तपास अंतीम टप्प्यात आहे. गृहमंत्री फडणवीस हे गुन्हा दाखल असतानाही सुरेश धस यांना सोबत घेवून फिरत आहेत, सभेत स्टेजवर सोबत घेत आहेत. त्यामुळे अधिकार्यांवर दबाव येत आहे. आणि माझ्यावरही दबाव आणण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे राम खाडे यांनी सांगितले.