लखनौ-उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने डॉक्टरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर १० वर्षे सरकारी नोकरी करावी लागणार आहे. जर त्यांनी ही नोकरी कालावधी पूर्ण होण्याआधीच सोडली, तर त्यांना तब्बल १ कोटी रुपयांचा दंड होणार आहे.
योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयामुळे नव्याने डॉक्टर होणाऱ्यांना (पीजी) आता किमान १० वर्षे सरकारी रुग्णालयात नोकरी करणं बंधनकारक असणार आहे. संबंधित डॉक्टरांपैकी कुणी मध्येच नोकरी सोडल्यास त्यांना १ कोटी रुपयांचा दंड होणार आहे. योगी सरकारने तसा नियमच केला आहे. याशिवाय डॉक्टरांना नीटमध्ये सूट देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होईल, अशी भूमिका उत्तर प्रदेश सरकारने मांडली आहे.
प्रजापत्र | Saturday, 12/12/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा