बीड दि. १६ (प्रतिनिधी ) : राखीव जागांवरून निवडून आलेल्या मात्र वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केलेल्या २१४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी घेतला होता. मात्र हे करताना ज्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले अशा देखील काहींना अपात्र करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होर्या. या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्याच आदेशात सुधारणा केली आहे. पूर्वीच्या आदेशात अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांमधून ४३ सदस्यांची अपात्रता आता रद्द करण्यात आली आहे. तर ५ सदस्य मयत असल्याने अपात्रतेची यादीतून त्यांची नावे देखील वगळण्यात आली असून आता अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांची संख्या १६६ इतकी झाली आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ६ जून रोजी मोठा निर्णय घेत जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या २१४ सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेतला होता. यात काही सरपंचांचा देखील समावेश होता. वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर गोंधळ मजला होता आणि अनेकांनी आपण वेळेत प्रमाणपत्र दाखल करून देखील आपल्याला अपात्र करण्यात आल्याचे सांगत तक्रार केली होरी. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयांकडून सुधारित अहवाल मागितले आणि त्यानंतर तब्बल ४३ सदस्यांची केलेली अपात्रता रद्द केली आहे. त्यामुळे आता त्या ४३ सदस्यांना अभय मिळाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रता रद्द करून अभय दिलेल्या सदस्यांमध्ये पिंपळगाव मोची - कोरडे रेवती भूषण,आखाडे क्रांती रामनाथ,वासनवाडी - बंगाळ राजाभाऊ लिंबाजी,कदमवाडी - कदम सुनिता भाऊसाहेब,कदम जगदीश भाऊसाहेब,नागापुर बु - ढोकणे किशोर नरहरी,सांळुके भरतरी जालींदर,चोपनवाडी - बडे सोनाली विलास,दिंद्रुड - कोमटवार अजय दिलीप,गंगामसला - पंडित पंकज विठ्ठल,दासखेड - आरगडे रुक्मीणी अशोक,पारगाव घुमरा - वारभुवन गोकुळ अंबादास,गांगुर्डे रंगुबाई यशवंत,भोपा - सुरेखा अंकुश तिडके,जहागीर मोहा - कोकाटे दिक्षा हनुमंत,रुई धारुर - सुनिता विजय राठोड,धनगरवाडी डो - गिरी शांताबाई बबन,सुंबेवाडी - शेंडगे अर्जुन धोंडीबा,शेंडगे हौसाबाई अर्जुन,मादळमोही - भोपळे हरी शिवाजी ,धुरंधरे कल्याण वामनराव,वाघमारे अल्का अरुण,पुरी गीतांजली सोमनाथ,धुरंधरे आशाबाई अंकुश,जव्हारवाडी - तावरे वैशाली सर्जेराव,जवरे द्रोपती गहिनाथ,गढ़ी - उगलमुगले गहिनीनाथ जालींद,कांबळे सुदामती विक्रम,नाकाडे सुरेखा नवनाथ,मोटे अर्चना अशोक,तळेवाडी - यमगर वैशाली बाळू,मुर्ती - फड रामराव सदाशिव,केंद्रेवाडी - तरकसे चांगदेव सटवाजी,केंद्रे बालासाहेब महादेव,हनुमंतवाडी - गिते शोभा लाहुदास,सोनपीर कौश्यल्या महादेव,वाकडी - गोमसाळे आशाबाई वैजनाथ,कांदे सिताबाई रामकृष्ण,कांदे सुधाकर दत्तात्रय,धावडी - तरकसे देवानंद मधुकर,नेहरकर मधुकर किसनराव,दत्तपुर - गिते संध्या त्रिंबक,पुरी उत्तम विश्वनाथयांचा समावेश आहे.