बीड - तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे आज (दि.१६) रोजी दुपारी साडे बारा वाजता अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकत्यांनी त्याठिकाणी जावून बाल विवाह रोखला.
समाजसेवी संस्थांसह पोलिस, ग्रामसेवक, सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनची टिम, सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, सारिका यादव, स्वप्निल कोकाटे, संतोष बन्सोडे, जायभाय पोलिस, ग्रामसेवक के.डी. वनवे व इतर त्याठिकाणी दाखल झाले आणि बालविवाह रोखला. १७ वर्षीय मुलगी साक्षाळपिंप्री येथील असुन मुलगा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचा असल्याची माहिती समोर आली आहे. बालविवाह रोखल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांसह इतरांना बीड येथे समितीसमोर आणण्यात आले होते. दरम्यान त्यांची समजूत काढण्यात आली.
बातमी शेअर करा