देशात मोठ्या मूल्याच्या बनावट नोटा ही एक मोठी समस्या बनली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून काढून घेतल्यानंतर बनावट नोटांचा काळा धंदा थांबेल, असे बहुतेकांना वाटत आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, बँकिंग प्रणालीत सापडलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात 28% ने कमी होऊन 9,806 नोटांवर आली आहे. याच कालावधीत 500 च्या बनावट नोटांची संख्या 14.6% ने वाढून 91,110 वर पोहोचली आहे.
बँकिंग क्षेत्रात सापडलेल्या एकूण बनावट भारतीय चलनी नोटांची संख्या (FICNs) मागील आर्थिक वर्षातील 2,30,971 नोटांच्या तुलनेत 2022-23 मध्ये 2,25769 नोटांवर आली आहे. यापूर्वी 2021-22 मध्ये ही संख्या वाढली होती.RBI च्या 2022-23 च्या वार्षिक अहवालात 20 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 8.4% वाढ आणि 500 रुपयांच्या (नवीन डिझाईन) नोटांमध्ये 14.4% वाढ झाल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे, 10, 100 आणि 2,000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये अनुक्रमे 11.6%, 14.7% आणि 28% ने घट झाली आहे.
या अहवालानुसार, 2022-23 दरम्यान बँकिंग क्षेत्रात सापडलेल्या एकूण बनावट नोटांपैकी 4.6% रिझर्व्ह बँकेत आढळून आल्या, तर उर्वरित 95.4% इतर बँकांमध्ये आढळून आल्या. देशातील एकूण नोटांच्या चलनात बनावट नोटांचा वाटा फक्त 0.00016% आहे.आरबीआयच्या या वार्षिक अहवालात असेही सांगण्यात आले आहे की 2022-23 मध्ये नोटांच्या सिक्युरिटी प्रिंटिंगवर 4,682.80 कोटी रुपये खर्च झाला होता, जो मागील वर्षी 4,984.80 कोटी रुपये होता.रिझव्र्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जगभरात विकासाचा वेग मंदावला आहे, परंतु चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहील.