अहमदाबाद : आयपीएलची फायनल सुरु होण्यापूर्वी आता चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या संघातील एका नामवंत खेळाडूने फायनल सुरु होण्यापूर्वीच निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आता यानंतर हा निर्णय़ बदलणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अंबाती रायुडूने रविवारी इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आणि गुजरात टायटन्सविरुद्ध 2023 मधील अंतिम सामना हा त्याचा स्पर्धेतील शेवटचा सामना असेल याची पुष्टी केली. 2018 पासून CSK चा भाग असलेल्या रायुडूने फ्रँचायझीसह दोन विजेतेपदे जिंकली; त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्समधून त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती.
बातमी शेअर करा