आयपीएल 2023 च्या प्ले् ऑफमधील पहिला क्वालिफायर सामना हा गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चारवेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला होता. चेन्नईने गुजरातचा 15 धावांनी पराभव करत दिमाखात फायनल गाठली होती. मात्र या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एक वादग्रस्त कृती केली होती. याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. मात्र या कृतीचा धोनीच्या फायनल खेळण्यावर परिणाम होऊ शकतो.
मथीशा पथिराना गोलंदाजी करताना काय झालं?
गुजरात टायटन्स फलंदाजी करत असताना 12 व्या षटकात पथिराना 8 मिनिटासाठी मैदानाबाहेर गेला होता. तो परत आल्यावर धोनीने त्याला 16 वे षटक टाकण्यास दिले. मात्र यावरूनच धोनी आणि अंपायर्स यांच्यात वाद झाला. त्यामुळे सामना बराचकाळ थांबला. धोनी देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो अंपायर्स सोबत वाद घालत राहिला. अखेर पथिरानानेच 16 वे षटक टाकले.
नियम काय सांगतोय?
आयपीएलच्या नियमाबद्दल बोलायचं झालं तर जर कोणता खेळाडू दुखापतीवर उपचार घेण्यासाठी किंवा इतर कारणाने मैदानाबाहेर जाते. त्यानंतर तो परत आल्यानंतर त्याला जेवढा वेळ बाहेर घालवला आहे तेवढा वेळ मैदानात घालवावा लागतो. त्यानंतरच तो गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे धोनीने वाद घालण्यात वेळ काढला, सामना तेवढावेळ (4 मिनिटे) रोखून धरला अन् 16 वे षटक पथिरानाकडूनच टाकून घेतले.
धोनीने नियमाचे केले उल्लंघन?
धोनीने नियमाचे उल्लंघ केले की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. निय 41.9 नुसार सीएसकेला जर शिक्षा द्यायची झाली तर जो वेळ फिल्डिंगच्यावेळी वाया घावलण्यात आला. त्या नियमानुसार अंपायर्स फिल्डिंग करणाऱ्या संघाला ताकीद देऊ शकतात. जर ही चूक त्यांना जाणीवपूर्वक केली असे त्यांना वाटले तर अशी चूक दुसऱ्यांदा करण्यासाठी संघावर 5 धावांची पेनाल्टी लावू शकतात. अर्थात संघाने नियम तोडला आहे की नाही याचा निर्णय अंपायर्सनी घ्यायचा आहे.
याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने ट्विट केले की, 'धोनीने 4 मिनिट अपायर्सना आपल्या बोलण्यात गुंतवले आणि 4 मिनिट काढून घेतले. अपायर्सनी स्थिती आपल्या हातात ठेवायला हवी होती. मात्र अंपायर्स फक्त हसत बसले. हे योग्य नाही. आता चर्चा आहे की धोनीने मुद्दाम वेळ वाया घालवला. त्याला दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा त्याला फायनलमधून बॅन देखील केलं जाऊ शकतं.'