Advertisement

मनोहर जोशींची प्रकृती ढासळली

प्रजापत्र | Wednesday, 24/05/2023
बातमी शेअर करा

मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना काल (२३ मे) हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयाने आता मेडिकल निवेदन जारी करून त्यांच्या प्रकृतीसंबंधित माहिती दिली आहे. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीसंबंधित माहिती देण्याकरता हिंदुजा रुग्णालायने मेडिकल स्टेटमेंट जारी केले आहे.यात रुग्णालयाने म्हटलं आहे की, “मनोहर जोशी यांची परिस्थिती चिंताजनक असून ते अर्धवट बेशुद्धावस्थेत हेत. त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement