Advertisement

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली

प्रजापत्र | Tuesday, 23/05/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते.थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते.

मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital Mumbai)  दाखल करण्याात आले. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाईल.

 

गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते
मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Former CM) , खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले होते. 

 

 

Advertisement

Advertisement