नवी दिल्ली :केंद्र सरकारने पाठवलेला नवा प्रस्तावही शेतकऱ्यांना फेटाळला असून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. कृषी कायदे रद्द व्हावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’द्वारे केलेल्या शक्तिप्रदर्शनाची दखल घेत केंद्र सरकारने बुधवारी संघटनांना प्रस्ताव पाठवला होता. दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्यासाठी आवाहन करणार आहेत. तसंच सरकारसोबत काम करण्याचं आवाहन करणार आहेत. शेतकरी आंदोलनावर ठाम असताना नरेंद्र सिंह तोमर अजून काय बोलतात याची आता उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा