Advertisement

बीड बसस्थानक बनला चोरट्यांचा अड्डा

प्रजापत्र | Tuesday, 16/05/2023
बातमी शेअर करा

बीड - शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या बीड (Beed) बसस्थानकात मागच्या काही दिवसांपासून चोरट्यांनी (thief) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे बसस्थानकातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.आज (दि.१६)दुपारी १२ च्या सुमारास एका मोबाईल (Mobile) चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र १० मिनिटातच संबंधित पोलीस (police) कर्मचाऱ्याने स्वतःत्या चोरट्याला सोडून दिल्याने खळबळ उडाली आहे.
   बीड शहरातील बस स्थानकात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.दोन दिवसापूर्वी एका महिलेचे लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्यानंतर ही पोलिसांकडून चोरट्यांचा ठोस बंदोबस्त होतं नाही. बसस्थनाकात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत आणि याला पोलीसच कारणीभूत ठरत असल्याचा प्रकार आज समोर आला. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पोलीस चौकीतील ढवळे एम नावाचे कर्मचारी कर्तव्यावर होते.यावेळी एका चोरट्याने प्रवाशाचा मोबाईल लंपास करून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला होता मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.  
त्यानंतर त्याला नागरिकांकडून चोप देण्यात आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर श्री.ढवळे यांनी त्या चोरट्याला ताब्यात घेतले.त्यानंतर त्याची विचारपूस केली आणि नागरिक घटनास्थळावरून पांगल्यानंतर त्या चोरट्याला ढवळे यांनी सोडून दिले.दरम्यान प्रकारामुळे खळबळ उडाली असून बस स्थानकातील चोरट्यांना पोलिसांचे अभय असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Advertisement

Advertisement