कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना सुरक्षीत स्थळी हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे.
कर्नाटक (Karnataka) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे राजकारणातील अनुभवी खेळाडू आहे. 7 वेळा आमदार राहिलेले आहेत. शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक मानले जातात. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाने त्यांना संपर्क साधला आहे. त्याच बरोबर काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये याची पुरेशी काळजी काँग्रेसकडून घेण्यात येत आहे.
निवडून आलेल्या सर्वच आमदारांना बंगलोरकडे रवाना करण्यात येणार असून तिथून जयपूरला हलवले जाण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्राने व्यक्त केली आहे. आमदारांची संपूर्ण जबबादारी ही डीके शिवकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे. काँग्रेसने रिसॉर्टबी बुक केल्याची माहीत मिळत आहे. त्याच प्रमाणे कर्नाटकच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आमदारांना घेऊन जाण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस काळजी घेत आहे. त्यासाठी त्यांनी विजयी उमेदवारांना सध्याकाळ पर्यंत बंगळुरुमध्ये येण्याचे सांगितले आहे. तेथून त्यांना जयपूरमध्ये नेणार असल्याचे समजत आहे. मात्र, सध्या काँग्रेसचे आकड्यांवर लक्ष आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष सुरु केला आहे.
आता पर्यंत हातील आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 125 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप (BJP) 68 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस (JDS) 25 जगांवर आघाडीवर दिसत आहे. ही आकडेवारी शेवटपर्यंत कायम राहते का याकडेही लक्ष असणार आहे.