बीड दि.9 (प्रतिनिधी):
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या आणि मागच्या काही वर्षात अडचणीत आलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 सदस्यीय संचालक मंडळासाठी 11 जून रोजी मतदान होणार असून 12 जून रोजी मतमोजणी होणार आहे. हा कारखाना सध्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असून या कारखान्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी आता माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे.
बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा एकेकाळी राज्यातील प्रमुख कारखान्यांमध्ये होता. सध्या माजी मंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. मागच्या काही काळात हा कारखाना विविध कारणांनी अडचणीत आलेला आहे. परळी तालुक्यातील शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या कारखान्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जोर लावलेला असून आता हा कारखाना नेमका कोणाकडे राहणार हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होणार आहे. राज्य सहकार प्राधिकरणाने या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. यात 10 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 16 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर 11 जून रोजी मतदान होणार असून 12 जूनला मतमोजणी होईल.
महत्त्वाचे दिवस
अर्ज भरणे-10 ते 16 मे
अर्ज माघारी घेणे-18 मे ते 1 जून
चिन्ह वाटप-2 जून
मतदान -11 जून
मतमो
जणी-12 जून