नवी दिल्ली - व्हॉट्सॲपच्या नवीन मासिक अहवालानुसार, कंपनीने वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि नियमांच्या आधारे मार्च 2023 मध्ये भारतात 47 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 1 मार्च ते 31 मार्च 2023 दरम्यान, व्हॉट्सॲपने 4,715,906 भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.
या अकाऊंटने भारतीय कायद्याचे किंवा व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सॲपवर 4,720 तक्रारी आल्याचेही अहवालात समोर आले आहे. त्यापैकी 4,316 बंदीचे आवाहन करण्यात आले होते, मात्र व्हॉट्सॲपने केवळ 585 खात्यांच्या विरोधात कारवाई केली.
फेब्रुवारीत 46 लाख भारतीय युझर्सवर बंदी घातली याआधी फेब्रुवारीमध्ये व्हॉट्सॲपने 46 लाख भारतीय यूजर्सवर बंदी घातली होती. यापूर्वी जानेवारीमध्ये 29 लाख, डिसेंबरमध्ये 36 लाख आणि नोव्हेंबरमध्ये 37 लाख खाती बंद करण्यात आली होती.
खाते का बंद होतात?
कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने त्याच्या व्हॉट्सॲपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा भडकावणारा मजकूर शेअर केला. तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केले तर त्याचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते.