Advertisement

बिबटयाला मारण्याचे आदेश...पण

प्रजापत्र | Monday, 07/12/2020
बातमी शेअर करा

बीडः बीड जिल्हयासह नगर आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालत दहशत निर्माण केलेल्या बिबटयाला ठार मारण्याचे आदेश अखेर देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश आले असले तरी प्रत्यक्षात बिबटयाला मारण्याची कारवाई कोण पार पाडणार हा वन विभागासमोरचा प्रश्न आहे.
बिबट्या किंवा वाघ अशा वन्यप्राण्यांना मारण्या संदर्भातील नियम अगोदरच कठोर आहेत. तसेच अशा वन्य जिवांना मारण्याचे प्रशिक्षण देखिल सरसकट सर्वांना दिलेले नसते. औरंगाबाद वनविभाग परिक्षेत्रात असे प्रशिक्षण घेतलेले मोजकेच लोक आहेत. यात आता सर्वांच्या नजरा औरंगाबादचे वन्यजीव संरक्षण अधिकारी सय्यद यांच्यावर आहेत. ते सेवानिवृत्त लष्करी जवान असुन प्रशिक्षित आहेत. सय्यद वगळता वनविभागात वन्यजिवांना मारण्याचे प्रशिक्षण फारसे कोणाला नसल्याने आता कारवाई करायची कशी हा प्रश्न वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांसमोर आहे.
दरम्यान सदर बिबटयाला मारण्याची परवानगी देण्यात आली असली तरी ठार मारणे हा शेवटचा पर्याय असतो आणि भविष्यात काही वाद उदभवल्यास हाच एकमेव पर्याय होता हे सिध्द करण्याची जबाबदारी कारवाई करणाऱ्या पथकावर असते, त्यामुळे देखील अडचणी वाढणार आहोत. अवनी वाघिणीच्या प्रकरणातील अडचणिंच्या अनेक आठवणी ताज्या आहेत.

खाजगी व्यक्तींची मदत घेणे अवघड
सदर बिबटयाला मारण्यासाठी काही शार्प शुटर्सला पाचारण करावे अशी मागणी होत असली आणि नवाबच्या नावाची चर्चा असली तरी ही चर्चा प्रत्यक्षात येणे अवघड आहे. कारण या कारवाईत कोणी सहभाग घ्यायचा हे आदेशात निश्चित करण्यात आले आहे, त्यामुळे यात खाजगी व्यक्तींना सहभागी करणे शक्य होणार नाही.

३१ जानेवारीची डेडलाईन
दरम्यान बिबटयाला जेरबंद करण्याचे किंवा ठार मारण्याचे आदेश असले तरी या आदेशाची अंमलबजावणी ३१ जानेवारीच्या आतच करावी लागणार आहे.

 

 हेही वाचा 

Advertisement

Advertisement