Advertisement

एकाच वेळी 4 फोनवर चालेल आता व्हॉट्सॲप

प्रजापत्र | Wednesday, 26/04/2023
बातमी शेअर करा

नवी दिल्ली - आता व्हाट्सअपमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते वापरण्यास (लॉग-इन) सक्षम असणार आहे. व्हाट्सअप वेबच्या मदतीने, तुम्ही फोन आणि पीसी (डेस्कटॉप) दोन्हीमध्ये समान व्हाट्सअप खाते वापरू शकता, आता हे वैशिष्ट्य फोनसाठी देखील उपलब्ध असणार आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअपचे हे फीचर काही आठवड्यांत सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअप बीटा यूजर्ससाठी जारी करण्यात आले होते. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नवीन फीचरची माहिती दिली आहे. त्याने लिहिले-आता तुम्ही एकाच वेळी चार फोनवर व्हॉट्सअपवर लॉग इन करू शकाल.

 

काय आहे नवीन फीचर
व्हॉट्सअ‌पच्या या नवीन फीचरमध्ये तुम्ही एकाच वेळी 4 डिव्हाईसवर कोणत्याही व्हॉट्सअप अकाउंटवर लॉग इन करू शकाल. ही सर्व डिव्हाईस स्वतंत्रपणे काम करतील. याशिवाय, प्रायमरी डिव्हाईसवर नेटवर्क नसतानांही व्हाट्सअप यूझर्स अन्य दुय्यम डिव्हाईसवर व्हाट्सअप चालवू शकतील.

युझर्स संदेश प्राप्त करण्यापासून संदेश पाठविण्यास सक्षम असतील. परंतु वापरकर्त्याच्या प्राथमिक उपकरणावर खाते दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्यास, लॉन इन अन्य उपकरणांमधून आपोआप लॉग आउट केले जाईल.

 

OTP द्वारे करू शकता लॉग इन
जर व्हॉट्सअप वापरकर्त्याला प्राथमिक उपकरणासह दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग-इन करायचे असेल, तर त्याला दुय्यम डिव्हाइसच्या व्हॉट्स ॲप एप्लिकेशन्वर जाऊन फोन नंबर टाकावा लागेल. यानंतर प्राथमिक फोनवर OTP येईल. जे प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही इतर डिव्हाइसवर देखील लॉग इन करू शकता. त्याचप्रमाणे, प्रायमरी डिव्हाईसवरील कोड स्कॅन करून इतर उपकरणे देखील जोडली जाऊ शकतात.

Advertisement

Advertisement