Advertisement

भारत बंद यशस्वी करा,बीडच्या भाजी मार्केटमध्ये शेतकरी समितीचा प्रचार

प्रजापत्र | Monday, 07/12/2020
बातमी शेअर करा

बीड-दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवार दिनांक ८ डिसेंबर रोजी देशव्यापी 'भारत बंद' होणार आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी आज सकाळी खासबाग, बीड येथील भाजी मार्केटमध्ये अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रचार करण्यात आला. 
                         दिल्लीत मागील १०-११ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी ऐतिहासिक एल्गार शेतकऱ्यांनी पुकारलेला आहे. देशभरातील शेकडो शेतकरी संघटना आणि करोडो शेतकरी तसेच सामान्य नागरिकांनी या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांसह कामगार, शेतमजूर, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. याप्रसंगी शेतकरी नेत्या व लोकतांत्रिक जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव प्रा. सुशिला मोराळे, बहुजन वंचित आघाडीचे नेते बबनराव वडमारे, सामाजिक नेते शेरजमाखान पठाण, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, माकप डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, शेकापचे भाई दत्ता प्रभाळे, अमोल राठोड, अनिल वडमारे, अनिकेत डोळस आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Advertisement

Advertisement