Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - राजकीय बळीच

प्रजापत्र | Friday, 21/04/2023
बातमी शेअर करा

खारघर दुर्घटनेमध्ये ज्यांचे बळी गेले ते बळी उष्माघातानेच गेले हे आता शवविच्छेदन अहवालात देखील समोर आले आहे. म्हणजे राज्य सरकारने जो भर उन्हात कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही गोष्टीचा इव्हेन्ट करण्याची जी सवय सरकारला लागली आहे, त्या सवयीने आप्पासाहेब धर्माधिकारींना दिलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा देखील जो इव्हेन्ट केला गेला, धर्माधिकारींच्या अनुयायांचा राजकीय फायदा उठविण्याची जी मानसिकता या कार्यक्रमामागे होती, त्या मानसिकतेतूनच हे बळी गेले आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. हे सारे बळी केवळ उष्माघाताचा नाहीत तर शिंदे फडणवीस सरकारच्या राजकारणाचे आहेत.

 

 

खर्गर येथे महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर जे बळी गेले, ते बळी उष्माघातानेच गेले हे आता स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला चेंगराचेंगरीमुळे , जखमा झाल्यामुळे असे बळी गेले असतील असे सामन्याच्या प्रयत्न सरकार आणि साधकांनी चालविला होता, मात्र आता शवविच्छेदन अहवालाने यातील वास्तव समोर आणले आहे. जे मृत्यू झाले त्याचे कारण उष्माघात हेच होते हे वैद्यकीय तज्ञांनी देखील सांगितल्याने सरकारी दाव्यांमधील पोकळपणा तर समोर आला आहेच, मात्र त्या सोबतच सरकारमधील काही लोकांच्या गर्दी जमविण्याचा आणि इव्हेन्ट करण्याच्या हट्टापायी सामान्यांना कसे जीव गमवावे लागतात हे दाखल शीफ़्ट झाले आहे.

 

मुळात राज्यभरात उष्मा वाढत आहे हे माहित असताना अशा मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आवश्यकता काय होती, हाच दार मोठा प्रश्न आहे. आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याइतपत त्यांचे योगदान काय आहे असले पप्रश्न विचारायचे नसतात आणि सरकार त्यांची उत्तरे देठी नसते हे एव्हाना सर्वांना कळून चुकले आहे. मात्र सरकारला धर्म,अधिकारींना केवळ पुरस्कार द्यायचा नव्हता तर त्यांच्या साधकांची म्हणून जी व्होट बँक आहे तीच कुर्वळायची होती, त्यांचे लांगुलचालन करायचे होते. मुळात हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारींना नागहीच, सरकारने हा पुरस्कार दिला आहे तो धर्माधिकारींच्या नावामुळे होणाऱ्या गर्दीला. म्हणूनच आतापर्यंत कधीच झाला नसेल असा खुल्या मैदानात महात्राष्ट्रभुषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम या सरकारने मोकळ्या मैदानात घेतला.
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार बद्दल सामान्यांना प्रेम तर दूर उलट तिडीक वाटावी अशी परिस्थिती आहे. अर्थात यालाही काही अपवाद आहेत, ज्या समूहाचे हितच केवळ भाजपच्या सत्तेच्या काळात साधले जाऊ शकते अशा समूहांना आजही हे सरकार आपले वाटते, मात्र हे सरकार ना भाजपच्या मूळच्या विचारधारेत बसते, ना संघ परिवाराला हे सारे मेनी आहे, संघातील वरिष्ठ पातळीवरील लोक याबाबतीत खाजगीत जे बोलतात ते झिणझिण्या जाणारे आहे. त्यामुळे या सरकारला, विशेषतः शिंदेंना गमावलेला जनाधार मिळविण्याची जास्त आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण झाले ते पाहता राज्यातील मोठ्याप्रमाणावर मतदार भाजपपासून दूर सर्कल आहे, त्यामुळेच भाजपला बाबाबुवांच्या चरणी लिन झाल्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकले आहे. शिंदेकन्हया सभांना मुंबईत देखील फारशी गर्दी जमत नाही, त्यामुळे आता बाबाबुवांच्या नावाने गर्दी जमविण्याचे फन्डे हे सरकार वापरीत आहे आणि त्यामुळेच भर उन्हात असले कार्यक्रम घेतले गेले. अप्पासाहेब धर्माधिकारींना पुरस्कार देऊन, त्यांचे अनुयायी आपल्यासोबत जोडण्यासाठीच हि खेळी खेळली गेली आणि त्यापायी या गर्दीत भरउन्हात थांबावे लागल्याने सामान्यांचे मात्र बळी गेले. अजूनही बळींचा आकडा नेमका किती आहे हे सांगायला सरकार तयार नाही . हा आकडा पन्नासपेक्षा देखील अधिक असण्याची भीती व्यक्त होत आहे. जिथे पुलावाममधील शहिदांबद्दल कोणी बोलायला तयार नाही तिथे गरीब बिचार्या साधकांबद्दल अश्रू ढाळायचे  कोणी ?  काहींच्या सत्तेचा सोपं सोपा व्हावा म्हणून असले काही बळी द्यावेच लागतात असली मानसिकता सत्तेवर असल्यावर असले राजकीय बळी जातच राहणार. 

 

Advertisement

Advertisement