Advertisement

रमाकांत कुलकर्णी यांचे निधन

प्रजापत्र | Sunday, 16/04/2023
बातमी शेअर करा

पुणे दि. १६ (प्रतिनिधी ) : आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत यशवंत  कुलकर्णी (आर.वाय) यांचे रविवारी (दि. १६ ) सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.त्यांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेतील सक्रिय पदाधिकारी म्हणून राहिलेले रमाकांत उर्फ आरवाय कुलकर्णी हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच रविवारी पुणे येथे त्यांचे निधन झाले. ५९ वर्षीय आर वाय कुलकर्णी हे अत्यंत मनमिळावू,हसतमुख व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात सावरकर विद्यालयात शिक्षिका असणाऱ्या पत्नी रोहिणी  (संजीवनी चाटोरीकर), मुलगा रोहित,मुलगी रश्मी , सून, जावई , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 'प्रजापत्र' चे संपादक सुनील क्षीरसागर यांचे ते व्याही होते. कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखात 'प्रजापत्र' परिवार सहभागी आहे. 

Advertisement

Advertisement